जमिनीच्या वादातून काकाचा पुतण्यावर लोखंडी टोकदार हत्याराने वार; तीन जण जखमी

Spread the love

जमिनीच्या वादातून काकाचा पुतण्यावर लोखंडी टोकदार हत्याराने वार; तीन जण जखमी

योगेश पांडे / वार्ताहर 

कल्याण – कल्याण पश्चिमेतील धाकटे शहाड कोळीवाडा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून एका काकाने स्वत :च्या पुतण्यावर वार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून ती फूटेज सध्या सोशल मिडियावर व्हायरल होते आहे.

शनिवारी संध्याकाळी कल्याणमध्ये जमिनीच्या वादातून एका कुटुंबात राडा झाला होता. या हाणा मारीत काकाने पुतण्याला लोखंडी टोकदार हत्याराने मारहाण केली. सीसीटीव्ही मध्ये कैद झालेल्याया घटनेत तीन जण जखमी झाले असून त्या पैकी एक जण गंभीर रित्या जखमी आहे.

गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव विनोद दत्तात्रेय कोट असे आहे. विनोद आपल्या आई-वडिलांसोबत शहाड परिसरात राहत होता. गेल्या काही वर्षांपासून विनोदचे त्यांच्या काकांसोबत वडिलोपार्जित जमिनीवरून वाद सुरु होते. शनिवारी सायंकाळी विनोदचे वडिल दत्तात्रेय कोट हे घरच्या टेरेसवर साफसफाई करत होते. त्यावेळी विनोद च्या काकांनी त्यांना पहिले असता त्यांना टेरेसवर पाण्याच्या टाकीचे काम सुरू असल्याचे गैरसमज झाला. त्यांच्यासोबत चर्चा करताविना टेरेसवर पाण्याची टाकी बसवली जात असल्याचा आरोप करत विनोदच्या काकांनी वाद सुरू केला.हा वाद वाढत गेला आणि काही क्षणातच या दोन्ही परिवारात हाणामारी सुरू झाली. आरोपी काकांचे नाव विष्णू कोट,काकूंचे नाव लीलाबाई कोट आणि त्यांचा मुलाचे नाव कुणाल कोट असे आहे. काकाच्या परिवाराने विनोद आणि त्याच्या आई-वडिलांना शिवीगाळ करत मारहाण केली सुरू केली असे सांगितले जात आहे. ही मारहाण थांबवण्यासाठी विनोद यांनी मध्यस्थी करण्याचे ठरवले.यावेळी काकाने वाद न थांबवता उलट विनोदवरतीच वार केला. काकांनी एख लोखंडी टोकदार हत्यार हातात घेऊन त्यांच्या पुतण्याच्या डोक्यावर आणि डोळ्याजवळ जोरात वार केला.

या पुढे या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेमध्ये तीन जणांना किरकोळ जखम झाली असून तर एक जण गंभीर जखमी झाले आहे. या प्रकरणी कल्याण खडकपाडा पोलिसांनी दोन्ही कुटुंबाविरोधात परस्पर गुन्हा दाखल करू आपला तपास सुरू केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon