पोलिसांनी २९ कोटींचा ड्रग्ज साठा केला नष्ट; कफ सिरपच्या १२६९ बाटल्यांचाही समावेश

Spread the love

पोलिसांनी २९ कोटींचा ड्रग्ज साठा केला नष्ट; कफ सिरपच्या १२६९ बाटल्यांचाही समावेश

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी २९ कोटी ७६ लाखांचा अमली पदार्थांचा साठा नष्ट केला आहे. विविध २७ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले २४० किलो ४२० ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत. एनडीपीएस कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली असून नष्ट केलेल्या ड्रग्जमध्येगांजा,चरस,मेफेड्रोन, हेरॉईन,कोकेन,कफ सिरप बाटल्यांचा समावेश होता.तसच नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या कोरेक्स कफ सिरपच्या १२६९ बॉटल्स,अल्प्रेझोलम नावाच्या १२७३० टॅब्लेट्सचा आणि ५७५२ ट्रॅमाडोल टॅब्लेट्सचाही यात समावेश होता. मीरा-भाईंदर,वसई-विरार पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कक्ष एकने ही धडक कारवाई केलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, मीरा-भाईंदर,वसई-विरार पोलिसांनी एनडीपीएस कायद्यांतर्गत २९ कोटी ७६ लाख ४६ हजार ५४० रुपये इतक्या किमतीचे अमली पदार्थ नष्ट केले.यामध्येगांजा,चरस,मेफेड्रोन,
हेरॉईन,कोकेन,कफ सिरप बाटल्या त्याचप्रमाणे अल्प्राझोलम आणि ट्रमाडोल टॅबलेट्सचाही समावेश होता. एकूण २४० किलो ४२० ग्रॅम वजनी जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांचा साठा नुकताच तळोजा येथील वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीत नष्ट करण्यात आला आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी शाखेच्या कक्ष -१ च्या पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे.

१६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालय क्षेत्रात विविध २७ गुन्ह्यांतर्गत हा अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता.यात काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या तब्बल १२६९ कोरेक्स या कफ सिरपच्या बॉटल्सचा आणि अल्प्रेझोलम नावाच्या १२७३०टॅब्लेट्सचा समावेश होता.तर,नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जप्त केलेल्या ५७५२ ट्रॅमाडोल टॅबलेट्सचा साठाही पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon