ठाणे गुन्हे शाखेची मोठी कामगिरी : सराईत वाहनचोर अटकेत, ७ गुन्ह्यांचा छडा, साडे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : गुन्हे शाखा, घटक-१, ठाणे पोलिसांनी वाहनचोरी करणाऱ्या सराईत आरोपीस अटक करून तब्बल ०७ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत पोलिसांनी २,८५,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ठाण्यात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी गुन्हे शाखा सक्रिय झाली होती. या मोहिमेत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितास अटक केली. चौकशीत त्याने विविध ठिकाणी केलेल्या वाहनचोरीची कबुली दिली.
या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक होत आहे.