गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणारे बोगस कॉल सेंटर उध्वस्त
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई – गुन्हे शाखा कक्ष-१२ ला १५ सप्टेंबर २०२५ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गोरेगाव (पूर्व) येथील विहान कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला. या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना ग्रीक स्क्वॉड आणि मॅकअॅफी अँटीव्हायरस रिन्यूअलच्या नावाखाली ई-मेल पाठवून फसवणूक केली जात होती. नागरिकांना टोल-फ्री नंबरवर संपर्क साधायला भाग पाडले जात असे. त्यानंतर त्यांना २५० ते ५०० डॉलर्सचे गिफ्ट कार्ड खरेदी करण्यास प्रवृत्त केले जाई, जे नंतर क्रिप्टोकरन्सीत रूपांतरित करून आरोपी आर्थिक फसवणूक करीत होते.
कारवाईदरम्यान पोलिसांनी १५ संगणक, १० लॅपटॉप, २० मोबाईल फोन जप्त केले. तसेच कॉल सेंटरचे २ चालक/मालक, १ मॅनेजर व १० टेलीकॉलर एजंट अशा एकूण १३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपींना न्यायालयासमोर हजर करून पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. पुढील तपास गुन्हे शाखा कक्ष-१२ करीत आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त श्री. शैलेश बलकवडे, तसेच पोलीस उपायुक्त श्री. विशाल ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. सचिन गवस आणि पो.नि. श्री. बाळासाहेब राऊत, सपोनि श्री. विजय रासकर, पोउपन अजय सावंत, सफौ. श्री. अल्ताफ खान, श्री. सुनिल चव्हाण, श्री. बाळकृष्ण लिम्हाण, श्री. कैलास सावंत, पोह श्री संतोष राणे, श्री. संतोष बने, श्रीमती समृध्दी गोसावी, श्री. विशाल गोमे, श्री. विशाल पवार, श्रीमती अर्पिता पडवळ, श्री. प्रसाद गोरुले, पोशि श्री. अरूण धोत्रे, पोशि श्री. विपूल ढाके, यांनी यशस्वीरित्या पार पाडली.