छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रग्ज पेडलरच्या घरात महादेवाची पिंड व जादूटोण्याचे साहित्य; पोलिसांच्या कारवाईने उडाली खळबळ

Spread the love

छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रग्ज पेडलरच्या घरात महादेवाची पिंड व जादूटोण्याचे साहित्य; पोलिसांच्या कारवाईने उडाली खळबळ

योगेश पांडे / वार्ताहर 

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर शहरात एमडी ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरच्या घरात पोलिसांना चक्क जादूटोणा करण्यासाठी वापरली जाणारं साहित्य आढळल्याने खळबळ उडाली आहे. याशिवाय या साहित्यामध्ये महादेवाची पिंडदेखील आढळली आहे. विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणारा हा पेडलर जादूटोणा करीत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याच्या घरात जनावरांची हाडे तसेच कवट्यांची माळ मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना एमडी ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरच्या घरावर पोलिसांनी छापा मारला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. या छाप्यात पोलिसांना एक गावठी कट्टा देखील मिळून आला आहे. नियाज नजीर शेख असे एमडी ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरचे नाव आहे. कटकट गेट भागातील मुजीब कॉलनी भागात तो राहत होता. विशेष म्हणजे आरोपी नियाज हा २०१८ मध्ये झालेल्या राजाबाजार दंगलीतील आरोपी आहे. तो सध्या जामिनावर बाहेर आहे.

आरोपीच्या घरात जनावरांची दोन हाडे, कासवाचे वरचे अवरण असलेले हाड, काळ्या रंगाचे कापडी भुताचे मास्क, चामडी हंटर, रसायनाच्या बाटल्या, कवड्याच्या माळा, रिल्व्हर रंगाच्या धातूचे ८४ नाणे, गोल्ड रंगाचे ७९ नाणे, दोन इंजेक्शन सिरींज, महादेवाची पिंड असलेले अगरबत्ती स्टँड, काचेच्या १० रिकाम्या बाटल्या, ९ काळ्या रंगाचे दगडगोटे, काही इलेक्ट्रिक वजन काटे आदी साहित्य मिळून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon