मुंब्रा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी : घरफोडी प्रकरणी महिला आरोपीला अटक, साडेचोवीस लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
मुंब्रा : मुंब्रा पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या एका महिला आरोपीला अटक करून तब्बल ३५ तोळे सोन्याचे दागिने व ₹२०,००० रोख रक्कम असा एकूण ₹२४,४२,००० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
गुन्ह्यांची वाढती संख्या लक्षात घेता मुंब्रा पोलिसांनी दक्षता ठेवून ही कारवाई केली. आरोपी महिला विविध भागांमध्ये घरफोड्या करून दागिने व रोकड लंपास करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून तिला अटक केली. तपासादरम्यान चोरीचा मोठा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्थानिक नागरिकांनी मुंब्रा पोलिसांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या सतर्कतेमुळे गुन्हेगारांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे.