खेड़ तालुक्यातील कुंडेश्वर घाटात पिकअप दरीत कोसळली; ८ महिला भाविकांचा मृत्यू, ३० हून अधिक जखमी
खेड – पुणे जिल्ह्यातील खेड़ तालुक्यात पाईट गावाजवळील कुंडेश्वर शिव मंदिराच्या दर्शनाला जाणाऱ्या महिला भाविकांचा पिकअप वाहन सुमारे ३० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ८ महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून २५ ते ३० जण गंभीर व किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना खेड़ तालुक्याच्या पश्चिम घाट परिसरात घडली. पापलवाडी येथील महिला भाविक दर्शनासाठी जात असताना वाहनाचा तोल सुटून ते दरीत कोसळले. घटनेची माहिती मिळताच खेड़ पोलिसांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने पाईट ग्रामीण रुग्णालय, खेड, चाकण व भोसरीतील विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
मृत महिला भाविकांची नावे
शोभा ज्ञानेश्वर पापळ, सुमन काळूराम पापळ, शारदा रामदास चोरगे, मंदा कानिफ दरेकर, संजीवनी कैलास दरेकर, मिराबाई संभाजी चोरगे, बायडाबाई न्यानेश्वर दरेकर, शकुंतला तानाजी चोरघे.
जखमींची यादी
पाईट ग्रामीण रुग्णालय – अलका शिवाजी चोरघे, रंजना दत्तात्रय कोळेकर, मालुबाई लक्ष्मण चोरघे, जया बाळू दरेकर
पोखरकर हॉस्पिटल, खेड – लता ताई करंडे, ऋतुराज कोतवाल, ऋषिकेश करंडे, निकिता पापळ, जयश्री पापळ
गावडे हॉस्पिटल, खेड – शकुंतला चोरगे, मनीषा दरेकर
शिवतीर्थ हॉस्पिटल, खेड – लक्ष्मी चंद्रकांत कोळेकर, कलाबाई मल्हारी लोंढे, जनाबाई करंडे, फसाबाई सावंत, सुप्रिया लोंढे, निशांत लोंढे
केअर वेल हॉस्पिटल, चाकण – सिद्धी ज्ञानेश्वर पापळ
बांबळे हॉस्पिटल, खेड – कविता सारंग चोरगे, सुलाबाई बाळासाहेब चोरगे, सिद्धीकार रामदास चोरगे, छबाबाई निवृत्ती पापळ
साईनाथ हॉस्पिटल, भोसरी – सुलोचना कोळेकर, मंगल शरद दरेकर, पुनम वनाची पापळ, जाईबाई वनाजी पापळ
साळुंखे हॉस्पिटल, खेड – चित्रा शरद करंडे, चंद्रभागा दत्तात्रय दरेकर, मंदा चांगदेव पापळ
खेड़ पोलिसांनी सांगितले की, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, वाहनाचा तोल सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांकडून अपघाताबाबत सखोल तपास सुरू आहे. या दुर्दैवी अपघातामुळे पापलवाडीसह परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक प्रशासन व स्वयंसेवी संस्थांकडून जखमींच्या उपचारासाठी मदतकार्य सुरू आहे.