गाडीचा दरवाजा लागल्याने गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये जोरदार राडा; विधानभवनाच्या गेटवरच शिवीगाळ

Spread the love

गाडीचा दरवाजा लागल्याने गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये जोरदार राडा; विधानभवनाच्या गेटवरच शिवीगाळ

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, विधानभवनाच्या गेटवरच भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये जोरदार राडा झाला आहे. यावेळी दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली आहे. विधानभवनाच्या गेटवरच हा संपूर्ण प्रकार घडला आहे. गोपीचंद पडळकरांच्या गाडीचा दरवाजा लागल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं, दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली. हा काय बालीशपणा आहे. त्यांनी दरवाजाला लाथ मारली तो दरवाजा आम्हाला लागला. अशा छोट्या-छोट्या गोष्टींकडे कोण लक्ष देतं म्हणून मी पुढे आलो. मुंबईत राहिलो आहे आयुष्यभर. ही कुठली पद्धत आहे, अंगावर आमच्या गाड्या घालायच्या? कोण ऐकून घेणार ओ? कशाला आमच्या अंगावर गाड्या घालायच्या? व्हिडीओमध्ये दिसेलना काय झालं ते. पहिल्यावेळेस पण असंच झालं, जाणून बुजून खोड काढायची. एवढा राग तुम्हाला का येतो? तुम्हाला एवढं का वाईट वाटावं, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

विधानभवनाच्या गेटवरच हा संपूर्ण प्रकार घडला,गोपीचंद पडळकरांच्या गाडीचा दरवाजा लागल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याचं पाहायला मिळालं. दोघांमध्ये जोरदार राडा झाला आहे. दोन्ही नेते यावेळी चांगलेच आक्रमक झाले. त्यानंतर आव्हाड यांनी पडळकरांवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सातत्यानं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल सुरू असतो. मात्र बुधवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्यामध्ये जोरदार राडा झाला आहे. गाडीचा दरवाजा लागल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार राडा झाला. विधानभवनाच्या गेटवरच दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिविगाळ केल्याचं पाहायला मिळालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon