मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात लॉटरी माफियांची दहशत; पोलिस आणि नेशनल एजन्सीच्या नावावर हफ्तेखोरी

Spread the love

मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात लॉटरी माफियांची दहशत; पोलिस आणि नेशनल एजन्सीच्या नावावर हफ्तेखोरी

“खेलो इंडिया खेलो”, “साई लॉटरी”, “जनता लॉटरी”सारख्या नावाने खुलेआम सुरू गैरकायदेशीर लॉटरी व्यवहार

पोलीस महानगर नेटवर्क 

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे – या शहरांत लॉटरी माफियांनी अक्षरशः दहशत निर्माण केली आहे. “खेलो इंडिया खेलो”, “साई लॉटरी” आणि “जनता लॉटरी” अशा नावाने बिनधास्तपणे सुरू असलेल्या गैरकायदेशीर लॉटरी व्यवहारामागे अनेक मोठ्या नावांतील आरोपींचा हात असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, या लॉटरी माफियांकडून पोलिस आणि काही नेशनल एजन्सींच्या नावाने हफ्ता गोळा करणारा ‘रहमान’ नावाचा खबरी असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. रहमान केवळ पैसे गोळाच करत नाही, तर पोलिस अधिकारी व तपास संस्थांचे नाव घेऊन लॉटरी चालवणाऱ्यांना धमकावतो.

सूत्रांच्या माहितीनुसार, रहमानचा मुख्य सहकारी ‘उस्मान गणी उर्फ थिंकलवर’ असून, त्याच्यावर २५ हून अधिक लॉटरी संबंधित गुन्हे दाखल आहेत. तो देखील हफ्ता वसुलीचे काम करतो. या ऑनलाइन आणि ऑफलाइन लॉटरींमुळे अनेक सामान्य कुटुंबांची आर्थिक वाताहत होत आहे, तसेच सरकारचं कोट्यवधींचं राजस्व बुडतं आहे.

यापैकी काही फंटर मागील काही दिवसांपासून मोठ्या गाड्यांमधून रात्रीच्या सुमारास वसुलीसाठी मुंबई, ठाणे परिसरात फिरत असल्याची माहिती आहे. यावेळी ते वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची नावे घेऊन धमकीही देतात, असंही उघड झालं आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि तपास यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा याचे दुष्परिणाम सामाजिक स्तरावर गंभीर स्वरूप धारण करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon