नागपूर सेक्सटॉर्शन प्रकरणाचा पर्दाफाश : २० वर्षीय तरुण अटकेत, ५० लाखांची फसवणूक उघड

Spread the love

नागपूर सेक्सटॉर्शन प्रकरणाचा पर्दाफाश : २० वर्षीय तरुण अटकेत, ५० लाखांची फसवणूक उघड

पोलीस महानगर नेटवर्क 

नागपूर – शहरातील २५ वर्षीय तरुणाला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवून तब्बल ४९.३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील २० वर्षीय सुंदरकुमार कुंदनकुमार सिंह याला अटक करण्यात आली असून, तो केवळ दहावी नापास असूनही सायबर गुन्ह्यांमध्ये पारंगत असल्याचे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले आहे.

व्हॉट्सअँपवरील अश्लील चॅटिंग आणि ब्लॅकमेलिंगचा कट

तक्रारदार तरुणाचा संपर्क जानेवारी महिन्यात एका अनोळखी युवतीशी व्हॉट्सअँपवर झाला. तिने स्वतःला दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थिनी म्हणून ओळख दिली आणि दोघांत अश्लील संवाद सुरू झाला. काही दिवसांतच व्हिडिओ कॉल आणि फोटोच्या माध्यमातून गैरवर्तनाचे पुरावे गोळा करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल सुरू झाला. आरोपींनी वेळोवेळी रक्कम मागून एकूण ४९ लाख ३४ हजार रुपये उकळले.

सायबर पोलिसांची कारवाई,

आरोपी नागपूरला आणला

या प्रकाराला कंटाळून पीडित तरुणाने सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर ४ मे रोजी नागपूर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या तपासात सुंदरकुमार हा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांचे पथक बिहारला रवाना होऊन त्याला अटक करून नागपूरला आणण्यात आले.

रॅकेटमध्ये अन्य आरोपींचा समावेश शक्य

सध्या आरोपीची कसून चौकशी सुरू असून, या सेक्सटॉर्शन रॅकेटमध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, याचा शोध घेतला जात आहे. नागपूर पोलिसांच्या वेळीच आणि निर्णायक कारवाईमुळे पुन्हा एकदा सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती आणि दक्षतेची गरज अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon