कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

Spread the love

कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

योग हा केवळ एका दिवसासाठी नव्हे, तर ती रोजची सवय असावी – महापालिका आयुक्त अभिनव गोयल

कल्याण – २१ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि एसकेडीसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर कल्याण स्थानकाजवळील कै. दिलीप कपोते वाहनतळाच्या सहाव्या मजल्यावर आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमात महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या मनोगतात योगाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “योग ही एखाद्या दिवसापुरती उत्सवाची गोष्ट नसून, ती आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असावी. जसे गाड्यांना वेळोवेळी सर्व्हिसिंगची गरज असते, तसेच आपल्या मनालाही विश्रांती, एकाग्रता व सकारात्मकतेसाठी योगाची गरज असते.”

या योग शिबिरात महापालिकेचे महापालिका आयुक्तांसमवेत उपायुक्त रमेश मिसाळ, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, शिक्षणाधिकारी विजय सरकटे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग सहभागी झाला होता.आर्ट ऑफ लिव्हिंगचे जेष्ठ प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली श्वसन तंत्र, आसने व मानसिक शांततेसाठी विविध आसन प्रकार शिकवण्यात आले.यावेळी उपस्थितांसाठी स्नॅक्स व जलपानाची व्यवस्था करण्यात आली होती.

महापालिका क्षेत्रातील शाळा तसेच महाविद्यालयांमध्येही शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगासने करीत योगाभ्यासाचा लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon