भाडे न वाढवता सर्व लोकल वातानुकूलित करणार, मुख्यमंत्र्यांनी सांगितला मुंबई लोकलसाठी मास्टर प्लॅन !

Spread the love

भाडे न वाढवता सर्व लोकल वातानुकूलित करणार, मुख्यमंत्र्यांनी सांगितला मुंबई लोकलसाठी मास्टर प्लॅन !

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – मध्य रेल्वेमार्गावरील मुंब्रा स्थानकाजवळ सोमवारी सकाळी झालेल्या लोकल रेल्वे अपघाताच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्र्यांची असंवेदनशीलता, अशा आशयाची बातमी पाहिली. मात्र सोमवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव माझ्यासोबत अडीच तास चर्चा करत होते. उपनगरातील सर्वाधिक वाढ मोदी सरकारच्या काळात झाली आहे. मेट्रो नेटवर्क न झाल्याने ओव्हरक्राऊडींग झाली आहे. काल बोलताना त्यांनी सांगितलं की, दरवाजे लावण्याचे काम करतोय. सरकारला कळतं व्हेंटिलेशनची व्यवस्था करावी लागेल. तेवढं डिझाईन डोकं सरकारकडे आहे. दरम्यान, एसी ट्रेन द्यायच्या आणि त्या भाडं न वाढवता द्यायचा, असा मास्टर प्लॅन सरकारकडे असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील मुंब्रा लोकल दुर्घटनेवर भाष्य केलंय.

दरम्यान, सरकार भाडे न वाढवता वातानुकूलित लोकल आणण्याच्या तयारीत आहे. एसी ट्रेन द्यायच्या आणि भाडं न वाढवता द्यायचा, तसा प्लान तयार केलेला आहे. मात्र कालच्या घटनेतून आपल्याला शिकावं लागेल. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यासाठी प्रयत्न करुन मार्ग काढेल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. शासकीय कार्यालयांना फ्लेक्सी डायलूट दिलेला आहे. खासगी कार्यालयासंदर्भात अडचण येत आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टसंदर्भात कपॅसिटी वाढवण्याचा प्रयत्न करु, असेही ते म्हणाले.

दरम्यान, मुंबईत झालेल्या लोकल अपघातात ४ प्रवाश्यांना जीव द्यावा लागला, अनेक जण गंभीर जखमी झाले. पण रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना त्याचे काही सोयरसुतक नाही का? असा प्रश्न आता साऱ्यांना पडतो आहे. कारण काल सकाळी अपघात होऊन देखील अजून पर्यंत रेल्वे मंत्र्यांकडून मृत प्रवाशांसाठी साधी श्रद्धांजली देखील वाहण्यात आली नाही. अपघाताची माहिती, त्यावर केलेल्या उपाययोजना, रेल्वेकडून करण्यात आलेले प्रयत्न याबद्दल तर माहिती दिलीच नाही, सोबतच मृतांना, जखमींना काही मदत देखील रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही मदत तरी मिळणार का? याची देखील माहिती नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी सोशल मीडियावर नेहमी सक्रियअसलेले रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव अजूनही भावनाशून्य कसे? असेही आता बोललं जातंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon