ठाणे एमडी ड्रग्ज प्रकरणात निलोफर सेंडोले ६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

Spread the love

ठाणे एमडी ड्रग्ज प्रकरणात निलोफर सेंडोले ६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

ठाणे – अँटी-नार्कोटिक्स सेलने कोट्यवधींच्या एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी फरार असलेली निलोफर सेंडोले हिला अखेर अटक केली आहे. निलोफर गेल्या १०० दिवसांपासून फरार होती. निलोफर आणि तिची साथीदार रुबिना, बांद्रा दर्गा गल्ली आणि म्हाडा ग्राउंड परिसरात काही वर्करच्या माध्यमातून एमडी ड्रग्ज विक्री करत होत्या. या टोळीने गुजरातहून किलोच्या प्रमाणात एमडी ड्रग्ज आणून ठाण्याच्या खेर भागात साठवणूक केली होती. फेब्रुवारी महिन्यात ठाणे अँटी-नार्कोटिक्स सेलने खेरमधील एका खोलीवर छापा टाकून २.५ कोटी रुपयांची एमडी ड्रग्ज जप्त केली होती. त्या वेळी निलोफर फरार झाली होती, पण तिचा एक नातेवाईक आणि गुजरातमधील दोन जणांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून पोलीस तिच्या शोधात होते. ती वेळोवेळी आपली ठिकाणं बदलत होती. अखेर पोलिसांना माहिती मिळाली की, निलोफर आणि रुबिना स्कुटीवरून मुंब्राकडे जात आहेत. विक्रोळी हायवेवर पाठलाग करून पोलिसांनी दोघींना अटक केली. त्यानंतर तिला ठाणे सत्र न्यायालयात न्यायमूर्ती श्री. गणेश पवार यांच्यासमोर हजर करण्यात आले. सुरुवातीला तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आणि आजच्या सुनावणीत न्यायालयाने ६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

न्यायालयात निलोफरला भेटण्यासाठी रुबिना, तिचे नातेवाईक, वर्कर आणि काही गुंड अशा एकूण २५ लोकांची गर्दी झाली होती. निलोफर आनंदी दिसत होती, कारण तिला वाटते की तिचा वकील लवकरच तिला जामिनावर बाहेर काढेल आणि ती पुन्हा ड्रग्जचा व्यवसाय सुरू करू शकेल. अटक होऊनही रुबिना अद्यापही बांद्रामध्ये वर्करच्या माध्यमातून ड्रग्जचा व्यवसाय करत आहे. त्यामुळे बांद्रा पोलीस आणि जुहू अँटी टेररिस्ट स्क्वॉडने या टोळीवर कडक नजर ठेवण्याची गरज आहे. हजारो कॉलेज विद्यार्थी आणि युवक या एमडी ड्रग्जमुळे बिघडत आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon