गुजरातमध्ये पत्नीची हत्या करण्याऱ्या आरोपीला मुंबईच्या घाटकोपरमधून बेड्या, पंतनगर पोलिसांची कामगिरी
रवि निषाद/मुंबई
मुंबई – गुजरातच्या अहमदाबाद येथे पत्नीचा निर्घृनपणे खून करून फरार झालेल्या आरोपीस माहिती मिळाल्या पासून एका तासाच्या आत शोधून ताब्यात घेऊन संबंधित गुजरात पोलीस ठाण्याचे स्वाधीन केले आहे. सदर उत्तम कामगिरी घाटकोपर पंतनगर पोलिसांनी केली आहे.
मिळाली माहितीनुसार, नारोल पोलीस स्टेशन अहमदाबाद शहर राज्य गुजरात येथे दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक ५७७/२०२५ कलम १०३ (१) भारतीय न्याय संहिता सह गुजरात राज्य पोलीस अधिनियम १३५ (१) अन्वये दाखल गुन्हयातील पिडीत महिला रिना राजेंद्र वर्मा तिची राहत्या घरी निर्घृणपणे हत्या करून तिचा पती अनिल उर्फ बोबी जंगम, राहणार साठे नगर, रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर पूर्व हा आरोपी फरार असल्याचे समजल्या वरून त्यांनी आरोपीचे वापरते मोबाईल फोनवरून लोकेशन घेता सदर गुन्हयातील फरार आरोपी हा रमाबाई आंबेडकर नगर येथे आल्याचे त्यांना समजून आले. आमदाबाद शहर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तसेच नारोल पोलीस ठाण्याकडून करण्यात आलेल्या विनंतीनुसार गुन्हयातील फरार आरोपी यास पकडून देण्याकरीता मदत केली. विनंतीनुसार गुन्हयाचे गांभीर्य ओळखून तात्काळ घाटकोपर पंतनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवले यांच्या मार्गदर्शना खाली पंतनगर पोलीस ठाणे नेमणुकीतील अधिकारी व स्टाफ यांनी आरोपीचे लोकेशन व आरोपीची इत्यंभूत माहिती घेऊन आरोपीस शिताफिने ताब्यात घेऊन नारोल पोलीस ठाण्या कडून आलेल्या पोलीस पथकाच्या स्वाधीन केले आहे. यातील पिडीत महिला रीना वर्मा ही देखील रमाबाई आंबेडकर नगर येथे राहत होती सन २०१७ पासून आरोपी श्री अशोक जंगम वय २८ वर्ष राहणार तांडेल गल्ली, साठे नगर रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर पूर्व. मुंबई हे दोघे अहमदाबाद येथे कामानिमित्त गेले होते सदर ठिकाणी पती-पत्नी मध्ये असलेल्या चारित्र्याच्या संशया वरून आरोपी श्री जंगम याने दि. २०/ ०५/२०२५ रोजी पूर्वी पत्नी रीना हिच्या राहत्या घरी निर्घृनपणे गंभीर जखमा करून जिवे ठार मारले. या कारणावरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत.