कल्याण मध्ये पोलीस परिमंडळ – ३ च्या वतीने’ऑल आऊट कोम्बींग ऑपरेशन’

Spread the love

कल्याण मध्ये पोलीस परिमंडळ – ३ च्या वतीने’ऑल आऊट कोम्बींग ऑपरेशन’

कल्याण – कायदा, सुव्यवस्था व आंतरिक सुरक्षणा अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांच्या आदेशान्वये परिमंडळ ३ कल्याण अंतर्गत कल्याण व डोंबिवली शहरात दोन दिवस ऑल आऊट कॉम्बीग ऑपरेशन राबविण्यात आले होते.

सदर ऑल आऊट कॉम्बीग ऑपरेशन कारवाई करीता परिमंडळ ३ कल्याण मधील ४७ पोलीस अधिकारी व २०८ पोलीस अमंलदार सहभागी झाले होते. ऑल आऊट कोम्बींग ऑपरेशन कारवाई मध्ये शस्त्र जप्ती (भारतीय हत्यार कायदा ४,२५) ०३, अवैध धंदयावर कारवाई-०९, दारू विकी- ०६, दारूबंदी-०३, तंबाखूजन्य पदार्थ (कोप्ता) कारवाई-२६ केसेस, प्रतिबंधात्मक कारवाई- ८८, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम अंतर्गत १४२ ०२. अंमली पदार्थ संबंधीत कारवाई- ०७, अंमली पदार्थ सेवन-०७ याप्रमाणे एकुण २५ गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचप्रमाणे फरारी आरोपी, पाहिजे आरोपी, गुंड, हिस्ट्रीशिटर, हददपार इसमांची तपासणी करण्यात आली. सदर ऑल आऊट कोम्बींग ऑपरेशन कारवाई करीता १० ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. नाकाबंदी दरम्यान एकुण २७६ वाहने तपासण्यात येवुन, ६६ वाहनांवर मोटर वाहन कायद्यान्वये ६६ कारवाई करण्यात येवुन ७८,७००/- रू दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच यापुढेही कल्याण व डोबिवली शहरात ऑल आऊट कोम्बींग ऑपरेशन कारवाई सुरू राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon