दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून मित्रांमध्ये राडा, सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यलयापासून हाकेच्या अंतरावर हाणामारीचा थरार
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – मित्राने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, म्हणून झालेल्या वादातून मित्रांनीच एकमेकांवर चाकूने वार केले आणि डोक्यात वीट घालून गंभीर जखमी केल्याची घटना कल्याण पश्चिमेकडील एसीपी कार्यलयापासून हाकेच्या अंतरावर घडली आहे. या वादात मित्र जखमी झाले आहेत. दरम्यान महात्मा फुले पोलिसांनी दोघांनी दिलेला तक्रारीनुसार परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. धक्कादायक म्हणजे एसीसीपी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली आहे. त्यामुळे पोलिसांचा धाक राहिला नाही कां? असा सावल उपस्थिती केला जातोय.
कल्याण पश्चिम येथे शनिवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास महेंद्र निचित याने त्याचा मित्र तेजस निखारगे याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने महेंद्र याने त्याच्याकडील धारदार चाकूने वार करत तेजस याला गंभीर जखमी केले. त्याला सोडविण्यासाठी मध्ये पडलेले मित्र मोहन नाडार आणि अभिनंदन खरात देखील जखमी झाल्याची तक्रार तेजसच्या मित्राने महात्मा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. याचवेळी महेंद्र याने आपल्या तक्रारीत आपण घरी जात असताना आपल्या ओळखीच्या तेजस निखरगे याने आपल्याकडे दारूसाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने तेजससह त्याच्या दोन मित्रांनी आपल्याला लाथा बुक्क्यांनी आणि विटांनी मारहाण केल्याचे नमूद केले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान हे दोघे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले.