सायबर फसवणूक करणारी टोळी जेरबंद, वाकोला पोलिसांची कारवाई

Spread the love

सायबर फसवणूक करणारी टोळी जेरबंद, वाकोला पोलिसांची कारवाई

मुंबई – वाकोला पोलीस ठाण्याच्या सायबर सेलने सायबर फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या गुन्ह्यात फिर्यादी अरिंदम महापात्रा यांची ३ लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक झाली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात दिनांक १४ जानेवारी २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक तपास करून पोलिसांनी राजस्थान आणि छत्तीसगड येथे कारवाई करून खालील ५ आरोपींना अटक केली असून राजकरणसिंग तंवर (१९), करणसिंग सेगर (१९), मोहम्मद शाकीब अन्सारी (२७), मिराज अन्सारी (२०) व फुजेल अन्सारी (२१) यांचा समावेश आहे.

सदर गुन्ह्याच्या तपासात समोर आले आहे की, या आरोपींनी मुंबईसह देशभरात मिळून ३० कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे. त्यामध्ये मुंबईतून ७ कोटी २७ लाख रुपये, पश्चिम सायबर पोलिस ठाणे : ४० लाख ८५ हजार रुपये, उत्तर सायबर पोलिस ठाणे, १३ लाख ८४ हजार रुपये, पिंपरी-चिंचवड सायबर पोलिस, २२ लाख ८५ हजार रुपये, विलासपूर (छत्तीसगड) सायबर पोलिस : ४८ लाख रुपये,

सदर तपास पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अप्पर पोलीस आयुक्त परमजित सिंग दहिया आणि उपआयुक्त मनिष कलवानिया यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. तपासाचे नेतृत्व वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर व सायबर सेल प्रमुख पोनि. अमर पाटील यांनी केले. त्यांना पोउपनि. यशपाल बडगुजर, पोउनि. जिवन गुटटे, पो.शि. संदीप अमूप आणि महिला पो.शि. रुपाली सावंत यांनी मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon