एएनसीची फरार आरोपी निलोफरची टरकली; पोलीस कारवाईच्या भीतीने आजारपणाचं सोंग घेत थेट बांद्राच्या बाबा रुग्णालयात दाखल
मुंबई – मुंबई एएनसी डीसीपी, बांद्रा व ठाणे एएनसी यांना पूर्ण माहिती देऊनही अजूनपर्यंत निलोफरला अटक का करण्यात आलेली नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. मुंबईच्या बांद्रा दरगाह गल्लीमध्ये एमडी ड्रग्सची खुलेआम विक्री निलोफर आणि रुबिना आपल्या वर्करच्या मदतीने चालवत होत्या. “डेली मराठी” या वृत्तपत्रात सातत्याने बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर एएनसी, बांद्रा पोलिस आणि बांद्रा क्राईम ब्रँचने अनेक ठिकाणी छापे टाकून ड्रग्स विक्री करणाऱ्या वर्कर्सना अटक केली आहे. मात्र मुख्य ड्रग्स माफिया रुबिना बांद्राहून स्थलांतर करून आता कुर्ला पश्चिमेतून एमडी ड्रग्स विक्रीचा धंदा चालवत आहे. या प्रकरणी रुबिनाची पार्टनर निलोफर हिला पोलिस शोधत होते. अटकेपासून वाचण्यासाठी निलोफरने वृत्तपत्रात आपले नाव छापल्यामुळे “रिपोर्टरच्या त्रासाने मी विष पिले” असे नाटक करून आत्महत्या करण्याचा डाव रचला आणि गेल्या चार दिवसांपासून बांद्र्याच्या बाबा रुग्णालयात भरती आहे. बांद्र्याचे बाबा रुग्णालय देखील बदनाम आहे, जिथे पैसे घेऊन बनावट रिपोर्ट तयार केले जातात आणि अशा प्रकारचे नाटक करणाऱ्यांना सहज भरती करून घेतले जाते.
निलोफर आणि रुबिना फरार आहेत
ठाणे एएनसीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल मास्के यांच्या पथकाने १२ फेब्रुवारी २०२५ रोजी ठाण्यातील शेलटायगर परिसरातील ‘चट्टान अपार्टमेंट’मधील रूम नंबर २०२ वर छापा टाकला होता. तिथे इलियास खान (१९ वर्षे, राजस्थान रहिवासी), अमान कमाल खान (२१ वर्षे, राजस्थान रहिवासी) व शैफाली असबहुल हक खान (२५ वर्षे) यांना अटक करण्यात असून त्यांच्याकडून १ किलो ११० ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले, ज्याची किंमत सुमारे २.२६ कोटी रुपये आहे.
शैफाली खान ही रुबिनाच्या जावयाची पत्नी आहे. ज्या फ्लॅटमधून ड्रग्स जप्त करण्यात आले तो फ्लॅट निलोफरचा आहे. निलोफर आणि रुबिना राजस्थानहून ड्रग्स मागवून या फ्लॅटमध्ये पॅकिंग करून संपूर्ण मुंबई आणि ठाण्यात वितरित करत होते. २०२१ मध्ये एनसीबीचे तत्कालीन प्रमुख समीर वानखेडे यांनी सुद्धा निलोफर आणि रुबिनाला ड्रग्स प्रकरणात पकडले होते. मात्र जामिनावर सुटल्यानंतर या दोघींनी संपूर्ण महाराष्ट्रात एमडी ड्रग्स विक्रीचे मोठे जाळे उभे केले.
निलोफर व रुबिना सरकारच्या कुणी आहेत का ?
गेल्या ४ दिवसांपासून मुंबई पोलीस आणि ठाणे पोलीस यांना निलोफर आणि रुबिनाची संपूर्ण माहिती देऊनही अजूनपर्यंत कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याप्रकरणी पत्रकार सुधाकर नाडर यांनी ठाणे एएनसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मास्के यांच्याशी संपर्क साधला असता, “तुमच्या प्रकरणात फरार आरोपी निलोफर बाबा रुग्णालयात आहे, तुम्ही तिला अटक का करत नाही?” असे विचारले असता ते म्हणाले की, “ती अजून रुग्णालयात आहे, तिला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.”
मुंबई एएनसी डीसीपी गुगे आणि बांद्रा युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना प्रकरण क्रमांक १८६/२५, शेलटायगर पोलीस स्टेशनचा प्रेस नोट, फोटो व सर्व माहिती पाठवण्यात आली असून त्यांनी सांगितले, “आम्ही ठाणे एएनसीशी चर्चा करू, त्यानंतर त्यांची परवानगी घेऊन निलोफरला रुग्णालयातून अटक करू.”
मुंबई पोलीस सहसा लहानसहान प्रकरणातही फरार आरोपीला पकडण्यासाठी इतर राज्यांपर्यंत जातात. मात्र येथे, ३ कोटीं रुपयांच्या एमडी ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी निलोफर बांद्रा पोलीस स्टेशन आणि डीसीपी कार्यालयापासून अवघ्या १० पावलांवर रुग्णालयात नाटक करत आहे, आणि तरीही अजूनही कारवाई झाली नाही, त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. मुंबई व ठाणे पोलीस यावर कधी कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.