पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा पहिला फोटो समोर; हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या सहाय्याने दहशतवाद्यांचा शोध सुरु

Spread the love

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा पहिला फोटो समोर; हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या सहाय्याने दहशतवाद्यांचा शोध सुरु

योगेश पांडे / वार्ताहर 

पहलगाम – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दुपारी भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करणाऱ्या एका अतिरेक्याचा फोटो समोर आला आहे. घटनास्थळावरचा हा फोटो आहे. या दहशतवाद्याच्या हातात बंदूक दिसत आहे. फोटोमध्ये दहशतवाद्याचा चेहरा दिसत नाहीय. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या शोधसाठी सर्च ऑपरेशन सुरु आहे. एनआयए आणि फॉरेन्सिक टीम श्रीनगमरध्ये पोहोचली. आर्मी, सीआरपीएफ, एसओजी, जम्मू पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या सहाय्याने दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस मुगल रोडवर तैनात आहेत. दरम्यान सुरक्षा यंत्रणांकडून पहलगाम हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांच स्केच जारी करण्यात आलं आहे.

पहलगाममध्ये सुरक्षा पथकांच ऑपरेशन संपल्यानंतर एनआयएची टीम लोकेशवर पोहोचली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह पहलगाम हॉस्पिटलमधून श्रीनगरला पाठवण्यात आले आहेत. पहलगामच्या बैसारन खोऱ्यात हा हल्ला झाला. यात लोकांना निवडून-निवडून लक्ष्य करण्यात आलं. या हल्ल्याची बातमी समजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय सौदी अरेबिया दौरा अर्ध्यावर सोडून मायदेशी परतले. दिल्ली विमानतळावर बुधवारी सकाळी उतरताच त्यांनी एअरपोर्टवर एक बैठक घेतली. या बैठकीला एनएसए अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मंगळवारी रात्रीच श्रीनगरमध्ये दाखल झाले.बुधवारी सकाळी त्यांनी घटनास्थळाला पहलगामला भेट दिली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पहलगाम हल्ल्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा केली. सध्या देशात शाळांना उन्हाळी सुट्टया सुरु आहेत. शिवाय उकाडा देखील प्रचंड आहे. त्यामुळे पर्यटक थंड हवेच्या ठिकाणी फिरण्यासाठी म्हणून काश्मीरला पसंती देतात. काल पहलगाममध्ये देशभरातून पर्यटक आले होते. त्याचवेळी दहशतवाद्यांनी सुनियोजित पद्धतीने हल्ला केला. यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon