साधूची वेशभुषा करून जेष्ठ नागरिकांकडून हातचलाखीने सोन्याची चैन घेवून फसवणूक करणाऱ्या ३ आरोपींना अटक; मानपाडा पोलिसांची कारवाई
महेंद्र उर्फ अण्णा पंडित / डोंबिवली
डोंबिवली – राज्यात ठिकठिकाणी फसवणूक व गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. अशीच एक घटना डोंबिवली परिसरात घडली आहे. दि. १६/०४/२०२५ रोजी फिर्यादी श्री.माधव दिवाकर जोशी, वय ७५ वर्ष हे भाजी घेवून वेटलॅन्ड पार्क जवळ, खोणी पलावा, डोंबिवली पुर्व येथून त्यांच्या राहत्या घरी जात असताना तीन अनोळखी इसमांनी एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून येवून त्यांच्यापैकी एक इसम हा साधुची वेशभुषा करून तो साधू असल्याची फिर्यादीस बतावणी करून फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादीच्या गळयातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व १० ग्रॅम वजनाची अंगठी हातचलाखीने फिर्यादीकडुन घेवुन फिर्यादीची फसवणुक केल्याबाबत तकार प्राप्त झाल्याने लागलीच तांत्रीक तपास करून गाडीचा नंबर निष्पन्न करून आरोपी १) राहुल धालनाथ भाटी उर्फ मदारी, वय २९ वर्षे, रा. गणेशपुरा, भरवाळ नगर, ता. देगाव, गांधीनगर, गुजरात, २) आशिष दिलीपनाथ मदारी, वय २० वर्षे रा. मु.पो. आलोळ, अराधरोड, रामदेवजी मदीराच्या मागे, ता. आलोळ, जि. पंचमहाल राज्य गुजरात सध्या रा. जय मल्हार हॉटेल मागील झोपडपटटी, गोवेनाका, कोनगाव, ता. भिवंडी व ३) लखन आबा निकम, वय ३४ वर्षे रा. मु. पो. आडेगाव, ता. म्हाडा, जि. सोलापुर सध्या रा. मु. पो. वाघोली कसेनंद, दत्तात्रय हरगुडे यांची बिल्डींग, काळुबाई मंदिराचे मागे, ता. हावेली, जि. पुणे यांना शिताफीने ताब्यात घेवून त्यांच्याकडून बतावणी करून घेतलेली १ लाख २० हजार रूपये किंमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व गुन्हा करण्यासाठी वापरलेली कार नं. एमएच ०३ सीएच ३९३२ ही जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे. सदर आरोपींना गुन्हयात अटक केली आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री. संजय जाधव, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ कल्याण अतुल झेंडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग श्री. सुहास हेमाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय कादबाने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राम चोपडे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) श्री. दत्तात्रय गुंड, पोलीस निरीक्षक (का.व सु) श्री. जयपाल गिरासे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. महेश राळेभात, संपत फडोळ, सागर चव्हाण, पोलीस हवालदार / राजेंद्रकुमार खिलारे, सचिन साळवी, सुनिल पवार, शिरीष पाटील, संजु मासाळ, विकास माळी, सुशांत पाटील, पोलीस नाईक / गणेश भोईर, कृष्णा बोराडे, यल्लपा पाटील, पोलीस शिपाई/घनश्याम ठाकुर, गणेश बडे, नाना चव्हाण, विजय आव्हाड, अशोक आहेर, सोपान शेळके, योगेश आडे यांचे पथकाने केलेली आहे.