चैन स्नॅचिंग करणाऱ्या तीन आरोपींना अटक, टिळकनगर पोलिसांची कारवाई 

Spread the love

चैन स्नॅचिंग करणाऱ्या तीन आरोपींना अटक, टिळकनगर पोलिसांची कारवाई 

मुंबई – टिळकनगर दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरील स्टार जंक्शनजवळ मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून तीन इसमांनी जबरी चोरी केली. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात कलम ३०९ (४), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करताना टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चार विशेष पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे गुन्ह्यात वापरलेली मारुती सुझुकी वॅगन आर (केएमएच ४७ एन ३३६७) आणि आरोपींचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी अंधेरी परिसरातून पाठलाग करून आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहमद मेहसाद जलील खान उर्फ सोनू (वय २१, राहणार नारायण नगर, घाटकोपर), समीर मोहमद अन्सार अहमद शेख (वय २०),ब मोहमद नसीब मुख्तार अहमद (वय १९) त्यांच्याकडून चोरी केलेली अंदाजे ४०,००० रूपयांची सोन्याची चेन आणि सुमारे ३,००,००० रूपयांची गाडी असा एकूण ३.४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तपासादरम्यान हे आरोपी वडाळा टी. टी. पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशाच प्रकारे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढत असल्याचे उघड झाले असून दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.वया गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह देशमुख करत आहेत.

पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे व सुरक्षा) सत्यनारायण, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, डॉ. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ६, नवनाथ ढवळे, सहायक पोलीस आयुक्त, देवनार विभाग, आबुराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत पवार, पोलीस निरीक्षक श्रीमती मनिषा कुलकर्णी, पोनि (गुन्हे) श्री. दिलीप माने यांच्या नेतृत्वाखालील टीमने पुढील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघमारे, पोलीस उप निरीक्षक विजयसिंह देशमुख, अजय गोल्हार, आत्माराम राठोड, पोलीस हवालदार सोमनाथ पोमणे, सुनिल पाटील, अंबादास सानप, सत्यवान साठेलकर, संजय आव्हाड, निलेश खरात, दशरथ राणे (तांत्रिक मदत) पोलीस शिपाई सुनिल बिचुकले, समीर पिंजारी, ज्ञानेश्वर झिणे, भरत नागरगोजे, विनोद भोसले, मनोज कडव, विकास काटकर या सर्वांना सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon