अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांची आई किम फर्नांडिस यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. जॅकलीनची आई किम फर्नांडिस यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. जॅकलीनची आई किम यांना २४ मार्च रोजी ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांची प्रकृती सातत्याने ढासळत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. दरम्यान, आईची तब्येत बिघडल्यामुळे जॅकलीनने कामातून ब्रेक घेतला होता. गेल्या अनेक दिवसांपासून ती आईसोबत हॉस्पिटलमध्ये होती. तिची काळजी घेत होती. जॅकलिन फर्नांडिस काही दिवसांपूर्वी इंडियन प्रीमियर लीगमध्ये परफॉर्म करणार होती. २६ मार्च रोजी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याच्या उद्घाटन समारंभात ती डान्स परफॉर्मन्स देणार होती. यासाठी सर्व तयारीही करण्यात आली होती, मात्र आईला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर जॅकलिनने आयपीएलमध्ये परफॉर्म करण्यास नकार दिला होता. आठवड्याभरापूर्वी अभिनेता सलमान खानही जॅकलिन फर्नांडिसची आई किमला भेटण्यासाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. यावेळी त्याने जॅकलिनच्या आईची भेट घेत विचारपूस केली होती.
जॅकलिन फर्नांडिसच्या आईलाही २०२२ मध्ये हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी त्यांच्यावर बहरीनमध्ये उपचार करण्यात आले होते. किम फर्नांडिस मनामामध्ये राहत होत्या, तर जॅकलीन कामाच्या कमिटमेंटमुळे भारतात राहत आहे. जॅकलिन फर्नांडिसने दिलेल्या मुलाखतीत तिच्या आईबाबत भाष्य केलं होतं. जॅकलिन म्हणाली होती की,’माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी ती नेहमीच खूप प्रोत्साहन देते. पण जेव्हाही मी ट्रॅकवरून इकडे-तिकडे फिरते, तेव्हा ती स्पष्टपणे बोलणारी पहिली व्यक्ती असते.