कल्याणमध्ये घरात घुसून महिलेची हत्या, रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह, मंगळसुत्रासह अन्य दागिने लंपास
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – कल्याणमधील ६० वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली आहे. तसंच, तिच्या घरातून दागिने लुटण्यात आले, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली. गुरुवारी संध्याकाळी कल्याणमधील एका गृहनिर्माण संकुलातील रजनी पाटकर तिच्या अपार्टमेंटमध्ये एकटी होती तेव्हा तिच्यावर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, घरात चोरट्यांनी जबरदस्तीने प्रवेश केला. अधिकाऱ्याने सांगितले की, रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या पाटकरचा जागीच मृत्यू झाला. घरात तिचे मंगळसूत्र आणि इतर दागिने गायब आहेत, असे त्यांनी सांगितले.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. घरात घुसून जबरी चोरी आणि हत्या झाल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलीस याप्रकरणी आरोपींचा शोध घेत आहेत.