पवईतील साई सॅफायर या २४ मजली इमारतीच्या सतराव्या मजल्यावर आग

Spread the love

पवईतील साई सॅफायर या २४ मजली इमारतीच्या सतराव्या मजल्यावर आग

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – पवई येथील गोपाल शर्मा इंटरनॅशनल स्कूल नजीकच्या साई सॅफायर या २४ मजली इमारतीच्या सतराव्या मजल्यावर गुरुवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास अचानक आग लागली.अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यात यश मिळवले या आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. संबंधित बहुमजली इमारतीच्या १७ व्या मजल्यावर आग लागताच रहिवाशांनी तात्काळ इमारतीवर बाहेर पळ काढला. तसेच, दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य हाती घेतले.

पोलीस आणि संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आगीची तीव्रता सातत्याने वाढत असून अग्निशमन दलाने ९ वाजून ५८ मिनिटांनी आगीला क्रमांक एकची वर्दी दिली. तसेच, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध अद्ययावत यंत्रणांच्या साहाय्याने आगिवर यश मिळवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon