गांजा तस्करी करणाऱ्या महिलेसह तिघांना बेड्या; ९६ किलो गांजासह ६३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

गांजा तस्करी करणाऱ्या महिलेसह तिघांना बेड्या; ९६ किलो गांजासह ६३ लाखांचा मुद्देमाल जप्त

योगेश पांडे / वार्ताहर 

पिंपरी- चिंचवड – पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गांजा तस्करी करणाऱ्या महिलेसह एकूण तीन जणांना अटक केली आहे. आरोपींकडून ९६ किलो गांजा दोन चार चाकी वाहनासह ६३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. संजय पांडुरंग मोहिते, मनसाराम नूरजी धानका यांच्यासह महिलेला अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड हे पोलीस अंमलदार निखिल वर्पे यांच्यासह गस्त घालत होते. दोन चार चाकी वाहनांमधून गांजाची तस्करी केली जात आहे. अशी गुप्त माहिती बातमीदार मार्फत मिळाली. पुणे- नाशिक महामार्गावरील रोहकल फाटा या ठिकाणी नाकाबंदी करून दोन्ही वाहन ताब्यात घेण्यात आली. दोन्ही वाहनातील एकूण तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे विचारपूस करण्यात आली.

यात एका महिलेचा देखील समावेश होता. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या समक्ष वाहन तपासल्यानंतर दोन्ही वाहनात एकूण सहा पोत्यांमध्ये ९६ किलो २०४ ग्रॅम गांजा आढळून आला. संजय पांडुरंग मोहिते, मनसाराम नूरजी धानका यांच्यासह महिलेला अटक करण्यात आली आहे. .या पैकी संजय मोहिते याच्यावर कामशेत आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon