डान्सबार संदर्भात नवीन कायदा येत्या अधिवेशनात मांडला जाणार; डान्सबारच्या नव्या कायद्याची चर्चा
डान्सफ्लोअरवर चारपेक्षा जास्त बारबाला नको, नोटा उधळता येणार नाहीत
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – राज्याच्या मंत्रिमंडळाची मंगळवारी बैठक पार पडली असून यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्या. मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत डान्सबार संदर्भात चर्चा झाली असून याबाबत नवीन कायदा येत्या अधिवेशनात मांडला जाणार आहे. या कायद्याला मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्याची माहिती समोर येत आहे. २००५ साली माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी डान्सबारला बंदी घातली होती. त्यानंतर डान्सबारचे मालक कोर्टात गेले होते. त्यानंतर एक प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने डान्सबारवरील बंदी उठवत अनेक नियम अटी लागू केल्या होत्या. होत्या. राज्य सरकारने २०१६ साली महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ ऑब्सेन डान्स इन हॉटेल्स, रेस्तराँ अँड बार रूम्स अँड प्रोटेक्शन ऑफ डिग्निटी ऑफ वुमन एक्ट २०१६ हा नवा कायदा केला होता. या कायद्यात नव्या तरतुदी करण्यात येणार आहेत.