लखनऊमध्ये १० कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; मुंबई साकीनाका पोलिसांची कामगिरी
मुंबई – मुंबई पोलिसांच्या साकीनाका पथकाने लखनऊ, उत्तर प्रदेश येथे मोठी कारवाई करत १० कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.
स्पेशल पोलीस आयुक्त देवेन भारती आणि सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली साकीनाका पोलिसांनी ही मोहीम राबवली, ज्यामध्ये लखनऊजवळ बेकायदेशीर एमडी (मेफेड्रोन) उत्पादन युनिटचा पर्दाफाश करण्यात आला. ,यामध्ये ५ किलो लिक्विड एमडी (मेफेड्रोन) – अंदाजे बाजारमूल्य रुपये ९ कोटी, ५०० ग्रॅम एमडी पावडर – अंदाजे बाजारमूल्य, रुपये १ कोटी,
मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कठोर भूमिकेचे हे आणखी एक यशस्वी उदाहरण असल्याने पोलिसांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.