बाबांच्या शिर्डीत सराईत गुन्हेगारांचा हवेत गोळीबार, स्थानिक गुन्हे शाखेकडून तीन आरोपीं ताब्यात

Spread the love

बाबांच्या शिर्डीत सराईत गुन्हेगारांचा हवेत गोळीबार, स्थानिक गुन्हे शाखेकडून तीन आरोपीं ताब्यात

योगेश पांडे/वार्ताहर 

अहमदनगर – शिर्डीत जगभरातून भाविक साईबाबांच्या समाधीवर डोके टेकविण्यासाठी येतात, त्याच शिर्डी शहरात सध्या चाललय काय सध्या असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. गेल्या आठवड्यात दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली. दोन साई संस्थांनच्या कर्मचाऱ्यांवर तसेच शिर्डीतील तरुणावर ड्युटीला येताना प्राणघातक हल्ला झाल्याची घटना ताजी असताना साईबाबांची शिर्डी पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने चर्चेत आली आहे. साईबाबांची शिर्डी पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने चर्चेत आली आहे. गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोंपीकडून तीन गावठी कट्ट्यांसह लाखोचा मुद्देमाल जप्त केला आहे.

साईबाबांच्या शिर्डीत हत्याकांडाची घटना ताजी असतानाच दहशत निर्माण करण्याचा आणखी एक प्रकार समोर आलाय. शिर्डीतील सराईत गुन्हेगारांनी हवेत गोळीबार करत तो व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल केला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत ३ गावठी कट्टे, ३ जिवंत काडतुसांसह २ लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी गणेश शेजवळ, अजय शेजवळ, रोशन कोते यांना ताब्यात घेतले आहे. तर फरार झालेल्या भाऊसाहेब जगताप आणि राकेश पगारे या दोन आरोपींचा शोध सुरू आहे. राज्यात दररोज गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येतात. यातील काही घटना या अतिशय विचित्र आणि हादरवून टाकणाऱ्या असतात. वाढती गुन्हेगारी चिंताजनक बनू लागली आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. परवाना नसकानबेधडकपणे बंदुकीचं सोशल मीडियामधून दहशत माजवणारे अनेक व्हिडीओ, कोयता गँग असे अनेक व्हिडी सोशल मीडियावर व्हायरल झाले. या सर्व घटना दहशतीच्या छायेत लोटणारी ठरली आहे. त्यामुळेच गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला की नाही असा सवाल उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon