चहात माशी पडल्याची तक्रार करणाऱ्या ग्राहकालाच हॉटेल व्यवसायिकाकडून बेदम मारहाण, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

चहात माशी पडल्याची तक्रार करणाऱ्या ग्राहकालाच हॉटेल व्यवसायिकाकडून बेदम मारहाण, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

योगेश पांडे/वार्ताहर 

सिंधुदुर्ग – देशातील पहिला पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुण्यातील पर्यटकाला हात, पाय बांधून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. कुडाळ तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील झाराप झिरो पॉईंट येथे ही घटना घडली आहे. चहात माशी पडल्यावरुन पर्यटक आणि हॉटेल व्यवसायिक यांच्यात वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झालं. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल व्यवसायिकाने पुण्यातील पर्यटकाला हात पाय बांधून बेदम मारहाण केली आहे. हे सगळं मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असताना अनेकजण पाहत होते. मात्र, कोणीही सोडवायला गेला नाही. पुण्यातील त्या पर्यटकांसोबत अजून काही पर्यटक होते. त्यांनी ११२ ला फोन करून कुडाळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानुसार कुडाळ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पर्यटकाला सोडवले. मात्र या पर्यटकाने पोलीस स्थानकात या घडलेल्या प्रकाराबाबत कोणतीही तक्रार दिली नाही. मात्र पोलिसांनी स्वतः तक्रार नोंदवली आहे.

पर्यटकाला मारहाण करणाऱ्या हॉटेल व्यवसायिक तन्वीर शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळं या जिल्ह्यात अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी पोलिसांनी पुढाकार घेऊन हा गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची माहिती सिंधुदुर्गचे अप्पर पोलीस अधीक्षक ऋषीकेश रावले यांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेवेळी मारहाण झालेल्या पर्यटकांसोबत पुण्यातील इतरही पर्यटक होते. त्यांनीच याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर तातडीूने पोलिस घटमनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित पर्यटकाला हॉटेल व्यवसायिकाच्या ताब्यातून सोडवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon