धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी; वांद्रे कौटुंबिक न्यायालयाकडून करूणा मुंडे यांना दरमहा २ लाखांची पोटगी देण्याचे आदेश

Spread the love

धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी;
वांद्रे कौटुंबिक न्यायालयाकडून करूणा मुंडे यांना दरमहा २ लाखांची पोटगी देण्याचे आदेश

योगेश पांडे/वार्ताहर

मुंबई – सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. करूण (शर्मा) मुंडे यांनी केलेले आरोप कोर्टाने मान्य केलेत. त्यासोसबतच न्यायालयाने करूणा मुंडे यांना दरमहा २ लाखांची पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने धनंजय मुंडे यांना दिले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. आताच धनंजय मुंडे हे कृषीमंत्री असताना २७५ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला आहे. यादरम्याना आता कोर्टाने त्यांना घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये दोषी ठरवत धनंजय मुंडेंना दणका दिला आहे. न्यायालयाचे आभार मानते, आज सत्याचा विजय झालेला आहे. लोकांना वाटतं की कोर्टामध्ये न्याय मिळत नाही. पण मला न्याय भेटलेला आहे. याआधीपण औरंगाबाद न्यायालयामध्येही माझ्या बाजूने निकाल लागला होता. न्यायालय आणि न्यायाधीशांचे आभार मानते. मला आणि माझ्या दोन मुलांना प्रत्येकी ५ लाखांप्रमाणे १५ लाखांची मागणी केली होती. मात्र आम्हाला २ लाखांची पोटगी मिळाली आहे. या मागणीसाठी मी परत हाय कोर्टामध्ये जाणार असल्याचं करूणा शर्मा यांनी म्हटलं आहे.

करुणा (शर्मा) मुंडे या कौटुंबिक कोर्टात केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही याची नोंद घ्यावी. करुणा, या धनजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा. कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि १,२५,००० रुपयाचा मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. दरम्यान, माझ्या आईने आत्महत्या केली होती, जसा माझा छळ आता सुरू आहे तसा त्यांनाही त्रास दिला होता. मला दोनवेळेस जेलमध्ये ठेवलं गेलं. येरवडा जेलमध्ये ४५ दिवस आणि बीडमध्ये १६ दिवस ठेवलेलं. कलेक्टरच्या केबिनमध्ये मला वाल्मिक कराडच्या गुंडांनी मारहाण केली. माझी गाडी फोडली, माझ्या बहिणीचं शारीरिक शोषण केल्याचं करूणा शर्मा यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon