घाटकोपरमध्ये ४३ अनधिकृत बांधकामांवर मनपाची कारवाई; रस्ते व पदपथ मोकळे
मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एन विभाग कार्यालयाने घाटकोपर (पश्चिम) रेल्वे स्थानकाजवळील झुनझुनवाला महाविद्यालय ते रामरहीम मित्र मंडळ दरम्यान असलेल्या ४३ अनधिकृत शेड आणि अतिक्रमणांवर (४ फेब्रुवारी २०२५) निष्कासनाची कारवाई केली. या मोहिमेमुळे परिसरातील रस्ते आणि पदपथ मोकळे करण्यात आले आहेत.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. घाटकोपर (पश्चिम) परिसरातील बेकायदेशीर देहविक्रय व्यवसाय हटविण्याच्या मागणीसाठी नागरिकांकडून तक्रारी मिळाल्यानंतर ही मोहिम राबवण्यात आली. उप आयुक्त (परिमंडळ-६) संतोषकुमार धोंडे आणि सहायक आयुक्त (एन विभाग) गजानन बेल्लाळे यांच्या नेतृत्वाखाली ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी ही कारवाई पार पडली. यावेळी पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.