कथित खिचडी घोटाळा प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना मुंबई उच्च न्यायालया कडून जामीन मंजूर

Spread the love

कथित खिचडी घोटाळा प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना मुंबई उच्च न्यायालया कडून जामीन मंजूर

योगेश पांडे/वार्ताहर 

मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सूरज चव्हाण यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. खिचडी घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली होती. मागील एक वर्षांपासून सूरज चव्हाण हे तुरुंगात होते. मुंबई महापालिकेने कोरोनाच्या काळात गरीब, स्थलांतरीत नागरिकांना खिचडी पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले होते. कंत्राटात निश्चित करण्यात आलेल्या वजनापेक्षा कमी खिचडी वाटप करण्यात आल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर ईडीने सूरज चव्हाण यांना अटक केली होती. सूरज चव्हाण हे युवासेनेचे पदाधिकारी आहेत. सूरज चव्हाण यांच्यासह ठाकरे गटाचे उपनेते अमोल किर्तीकर यांचीही चौकशी करण्यात आली होती. हायकोर्टाने सूरज चव्हाण यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. सूरज चव्हाण यांनी जामीनासाठी पीएमएलए कोर्ट आणि सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र, त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. अखेर सूरज चव्हाण यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला.

शिवसेना ठाकरे गटातील युवासेनेचे नेते आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून सूरज चव्हाणची ओळख आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गून्हे शाखेनं दाखल केलेल्या गुन्हा आधारावर, ईडीनं अटक केली होती. गेल्या १७ जानेवारी २०२४ पासून सूरज चव्हाण हे अटकेत आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळातील या कथित खिचडी घोटाळ्याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. पालिकेला खिचडी वाटपाचं कंत्राट पुरवताना पैकेटमध्ये ठरल्यापेक्षा कमी खिचडी भरल्याचा हा आरोप आहे. यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.

किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर, मुंबई पोलीस आणि इडीच्या तपासाने वेग घेतला होता.कोरोना काळात स्थलांतर करणाऱ्या गरीब कामगारांसाठी, ज्यांचे मुंबईत घर नाही अशा कामगारांसाठी लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय त्यावेळच्या सरकारने घेतला होता. केंद्र सरकारनेही त्याला पाठिंबा दिला होता. मुंबई महापालिकेने एकूण ५२ कंपन्यांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं. सुरुवातीच्या चार महिन्याच्या काळात चार कोटी खिचडी पॅकेट्स वाटण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. या कामात घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचे नाव यामध्ये घेण्यात आलं होतं.आणि याचमुळे हे प्रकरण जोरदार चर्चेत आलं. या कथित खिचडी वाटप घोटाळ्याची ईडीकडूनही चौकशी करण्यात आली होती.कोविड काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी आधी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सूरज चव्हाण आणि अमोल किर्तीकर यांची चौकशी केली होती. त्यानंतर सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon