मांडूळ साप घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक; शिरुर पोलिसांची मोठी कारवाई

Spread the love

मांडूळ साप घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक; शिरुर पोलिसांची मोठी कारवाई

योगेश पांडे/वार्ताहर 

शिक्रापूर – शिरुर शहरामध्ये बेकायदेशीरपणे मांडूळ जातीचा साप घेऊन फिरणाऱ्या दोघांना शिरुर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. मांडूळ साप जप्त करुन वनविभागाच्या ताब्यात दिला असून, देवदास ईमराज भोसले व धनेश्वर दुर्यभान भोसले असे पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार विजय शिंदे, सचिन भोई, नितेश थोरात, अजय पाटील, निरज पिसाळ हे शहारामध्ये गस्त घालत असताना दोन युवक रामलींग रोडलगत पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार मध्ये बेकायादेशीपणे मांढूळ प्रजातीचा साप घेऊन थांबले असल्याची माहिती मिळाली त्यांनतर पोलिसांनी सदर ठिकाणी जात संशयित असलेल्या स्विफ्ट कारची पाहणी केली असता त्या कारमध्ये दोन युवक मांडूळ साप घेऊन बसल्याचे दिसून आले.

दरम्यान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्या जवळील मांढूळ साप जप्त केला, तर पोल्सिंनी देवदास ईमराज भोसले (५१) व धनेश्वर दुर्यभान भोसले (३५) या दोघांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करत याबाबतची माहिती शिरुर वनविभागाचे वनपरीमंडळ अधिकारी गणेश पवार यांना देत जप्त केलेला मांडूळ साप त्यांच्या ताब्यात देण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहेत.

मांडूळ साप खूप गरीब प्राणी म्हणून ओळखला जातो त्याला दोन्ही बाजूने तोंडे असतात आणि सापाच्या प्रजातीमधील सगळ्यात गरीब प्राणी म्हणून ओळखलं जातं तो मांडूळ सहा महिने एका तोंडाच्या दिशेने चालतो तर दुसऱ्या तोंडाने परत सहा महिने चालत असतो असे फक्त ऐकून आहेत परंतु हे प्राणी शक्यतो जंगलामध्ये किंवा जमिनीच्या खाली राहतात कदाचित चुकून माणसाच्या आदळामध्ये आलात तर तो काही करत नाही तो त्याच्या वाटेने निघून जातो त्याला इतर सापासारखे जोरात पळता येत नाही त्यामुळे तो एकदम हळुवार चालत असतो परंतु आजपर्यंत मांडूळ साप कोणाला चावला कधी ऐकले नाही कदाचित तो माती खातो आणि त्याला दात असणार परंतु तो गरीब प्राणी असल्यामुळे त्याला आजपर्यंत कोणी मारले नाही आणि कोणाला चावल्याचे ऐकले नाही शेतकऱ्याचा मित्र म्हणून त्याची ओळख आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon