घाटकोपर मनपा एन विभागच्या हद्दीत फुटपाथ फेरीवालांच्या ताब्यात
रवि निषाद/प्रतिनिधि
मुंबई – मनपा एन विभागाच्या हद्दीत असलेल्या गारोडिया नगर मध्ये पुष्पा विहार हॉटेलच्या पाठीमागे अवैध फेरीवावालीनी ताब्यात घेतला आहे. तिथे फेरीवाले फुटपाथवर गैस सिलिंडरच्या वापर करुन दोन दोन चहाचे स्टॉल लावले आहेत. म्हणून त्या फुटपाथ वरून कुणीही ये/जा करू शकत नाही. त्या फेरीवाल्याकडून कामराज नगरचा एक दबंग पुढारी पैसे गोळा करतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो पुढारी त्याना संरक्षण देतो असे सांगण्यात येत आहे. दोन दिवस अगोदर या फेरिवाल्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस महानगरच्या पत्रकारानी मागनी केली होती. त्वावर मनपा एन विभागाची डैशिंग जेष्ठ लायसेंस इंस्पेक्टर नम्रता परब यांच्या देखरेखाखाली कारवाई झाली होती. पण, त्या पुढाऱ्याच्या संरक्षणात परत फेरीवाले तिथे धंदे लावत असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस महानगरच्या पत्रकारानी ह्याची तक्रार केली असता आता मनपाचे अधिकारी त्या फेरिवाल्यांवर कडक कारवाई कधी करतात याची उत्सुकता आहे. एका समाजसेवकाने सांगितले की, त्या फेरिवाल्यामुळे पादचारी ये – जान करू शकत नाहीत. सदर फेरीवाल्यांवर जो पर्यंत कडक कारवाई होत नाही तो पर्यंत दैनिक पोलीस महानगर बातमी लावून धरणार आहे.