घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीतील रहदारीच्या जागेवर कब्जा करून टपरीचं बांधकाम
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – घाटकोपर पूर्व येथील महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागात येणाऱ्या रमाबाई कॉलनीतील साठे नगर येथील रहदारीची जागा ताब्यात घेऊन टपरी टाकण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांना ये-जा करताना प्रचंड त्रास होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साठे नगर रमाबाई कॉलनीतील शौचालयाच्या मागे चक्कीच्या समोरील पॅसेजची जागा ताब्यात घेऊन तेथे पक्की टपरी बसविण्याचे काम सुरू आहे. सदर टपरी हटवण्यासाठी शेकडो रहिवाशांनी तक्रार दिलेली आहे. या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे डी.एम.चव्हाण मामा यांनी महानगरपालिका कार्यालयात लेखी तक्रार दिली आहे. याबाबत अनिल वर्मा नावाच्या तरुणाने सांगितले की, सदर टपरी बसवल्यामुळे येथील साठे नगरमधील प्रत्येक नागरिकाला समस्या भेडसावत आहेत. याबाबतची तक्रार भाजपचे उत्तर भारतीय मंडळ अध्यक्ष प्रकाश सच्चन यांनी केली आहे. त्यानी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे की, जर ती टपरी लवकरात लवकर हटवली गेली नाही तर आम्ही याच्या विरोधात आंदोलन करणार आहोत. त्यानंतर त्याची जबाबदारी मनपा प्रशासनची असेल असा इशारा देण्यात आला आहे.