मुंबईत वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या तरुणाचा पोलिसावर हल्ला, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

मुंबईत वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या तरुणाचा पोलिसावर हल्ला, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई – मुंबईत फेरीवाल्यांवर हल्ले होतात हे आपण ऐकलं होतं, पण आता वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्याला रोखले म्हणून त्याने पोलिसावरच हल्ला केल्याचा प्रकार मंगळवारी मालाड परिसरात घडला. यावेळी आरोपीने पोलिसाच्या डोक्यात काठी मारली. या हल्ल्यानंतर पोलीस खाली कोसळला. आरोपीविरोधात याप्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याचा हत्या करण्याचा प्रयत्न असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक फौजदार माणिक सावंत (५२) मालाड पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. नाताळच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून ते मालाड काचपाडा परिसरास गस्तीवर होते. त्यावेळी इतर दोन पोलिसही त्यांच्यसोबत मोबाइल व्हॅनमध्ये उपस्थित होते. त्या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे पाहणी करण्यासाठी सावंत तेथे गेले असता एक व्यक्ती वाहने विनाकारण अवडत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी सावंत यांनी त्याचा हात पकडून बाजूला नेले व त्याला तेथून जाण्यास सांगितले. त्यावेळी तो तरुण संतापला. त्याने तुला मारून टाकतो, असे बोलून बाजूला पडलेली काठी घेतली व सावंत यांच्या डोक्यात मारली. त्यामुळे सावंत बेशुद्ध होऊन खाली कोसळले. त्याबरोबर तो तरुण काठी तेथेच फेकून पळून गेला. सावंत यांच्यासोबत असलेले दोन पोलीस तेथे आले. त्यांनी सावंत यांना तात्काळ मालाड येथील तुंगा रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी सावंत यांच्यावर उपचार केले. त्यावेळी ते शुद्धीत आले. याप्रकरणी पोलिसांनी तपासणी केली. त्यावेळी आरोपीचे नाव अरुण हरिजन असून तो काचपाडा परिसरातील रहिवासी असल्याचे समजले. याप्रकरणी सावंत यांच्या तक्रारीवरून मालाड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९, १३२, ३५२ अंतर्गत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीला लवकरच अटक करून कारवाई करतील असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon