उल्हासनगरमध्ये हिट अँड रन, मद्यधुंद कार ड्रायव्हरने वाहनांना उडवलं, ड्राइवरसह ९ जखमी

Spread the love

उल्हासनगरमध्ये हिट अँड रन, मद्यधुंद कार ड्रायव्हरने वाहनांना उडवलं, ड्राइवरसह ९ जखमी

योगेश पांडे/वार्ताहर 

उल्हासनगर – पुण्यातील वाघोली चौकात रविवारी मध्यरात्री डंपरचालकाने फूटपाथवर झोपलेल्या लोकांना चिरडलं, त्यात तिघांचा मृत्यू तर ६ जण जखमी झाले. या घटनेने माजलेली खळबळ अद्याप शांत झालेली नसतानाच आता मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या उल्हासनगरमध्येही तशीच हिट अँड रनची दुर्घटना घडली आहे. उल्हासनगर शहरात मंगळवारी पहाटे मद्यधुंद कार चालकाने २ ते ३ वाहनांना उडवलं. या अपघातामध्ये ९ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उल्हासनगर शहरातील व्हीनस चौक रस्त्यावर मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. उल्हानगरमधील कँप नंबर ४ येथील व्हीनस चौकात मंगळवारी पहाटे हा अपघात झाला. या अपघातामध्ये कारचालकासह अनेक जण जखमी झाले आहेत. हा कारचालक व्हीनस चौकातून भरधाव वेगाने जात होता, तेव्हाच त्याच्या कारने रस्त्यावरील काही लोकांना तसेच वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्यांपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. कारचालकही जखमी झाला असून त्याचावरही रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon