‘कोब्रा’ कादंबरीचे प्रकाशन ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते संपन्न
रवि निषाद/प्रतिनिधि
ठाणे – सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त व्यंकट पाटील लिखित आणि संधिकाल प्रकाशनाच्यावतीने ‘कोब्रा’ या कांदबरीचे प्रकाशन कार्यक्रम रविवार दि.१४ डिसेंबर, २०२४ रोजी सायंकाळी ठाणे मराठी ग्रंथ संग्रहलंय, स्टेशन रस्ता,ठाणे येथे ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि ज्येष्ठ साहित्यिक तसेच नाट्यकर्मी अशोक समेळ यांच्या हस्ते संपन्न झाला. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी अभिनेते व जेष्ठ साहित्यिक अशोक समेळं यांच्या व पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे हस्ते पार पडला. सदर कार्यक्रमात बोलताना अशोक समेल म्हणाले कि, पोलीस खात्यात अशी सर्जनशील माणसं खूप कमी आहेत तसेच डॉ.प्रदीप ढवळ म्हणाले कि. पोलीस खात्यातला एक अधिकारी इतकं चांगल लिहू शकतो हे कौतुकास्पद आहे. त्यांनी एखादं चरित्र लिहील्यास शासनातर्फे त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करणार असल्याच ते म्हणाले.
डॉ.वैभव देवगिरकर संधीकाल प्रकाशन चे प्रकाशक अरविंद जोशी यांनी लेखकांचे कौतुक केले. नीता माली यांनी व बामणे यांनी कादंबरीचे समीक्षण केले तर प्रा.प्रज्ञा पंडित यांनी सूत्रसंचालन केले.