टँकरच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू; घात की अपघात ?
रवि निषाद/प्रतिनिधि
मुंबई – घाटकोपर येथील असल्फा लिंक रोड परिसरात पाण्याचा टँकर बेकायदेशीररीत्या विकत घेत असलेले पानी बुद्ध विहारजवळील चिराग नगर येथील रहिवासी असलेल्या अतुल कांबळे नावाचा व्यक्ती एका भीषण अपघातात मृत्यू पावला. येथील धुमाळ गॅरेज, असल्फा घाटकोपर लिंक रोडचे काम सुरू होते, जे साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत हा अपघात आहे की षड्यंत्राचा भाग आहे,असा सवाल उपस्थित केला जात आहे त्यावर कारवाई न झाल्याने पीडितेच्या कुटुंबीयांमध्ये व स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, या घटनेची चौकशी करण्यात यावी,अशी मागणी ही पोलिसांकड़े करण्यात आली आहे. पोलिस सांगत आहेत की, संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे काम स्थानिक पोलीस करणार आहेत.