कात्रज गावातील ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळक्याच्या मुसक्या आवळल्या
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी मोठया वाढत चालली आहे. कात्रज येथील ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यासाठी जमलेल्या एका टोळक्याला पोलिसांनी पकडले़. खुनाचा गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या एका अल्पवयीनासह ६ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत चेतन नारायण गोरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सहा अल्पवयीन मुलांवर दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज गाव येथील गणेश मित्र मंडळाजवळ काही जण जमले असून त्यांच्याकडे कोयता, पालघन, मिरची पुड, दुचाकीसह थांबले असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने तेथे पथक पाठवून या मुलांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यात तिघांना पकडण्यात यश आले. मात्र तिघे पळून गेले. पोलिसांनी त्यांच्याकडून कोयता, पालघन, मिरची पुड व दुचाकी जप्त केली आहे. अधिक चौकशी केल्यावर कात्रज गावातील ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यासाठी एकत्र आल्याचे सांगितले. हे सर्व जण अल्पवयीन असून त्यांच्यातील एकाच्या नावावर यापूर्वी खुनाचा गुन्हाही दाखल आहे. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करीत आहेत.