सेवानिवृत्त महिला व पुरुष पोलीस कर्मचारी यांच्यावर नाष्टा विक्रेते नाराज
रवि निषाद/प्रतिनिधि
मुंबई – रमाबाई कॉलनीत राहणारे निवृत्त पोलीस कर्मचारी आणि पंतनगर पोलीस ठाण्यातून निवृत्त झालेले जाधव आणि दुसऱ्या पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या लता आव्हाड या महिला पोलीस कर्मचाऱ्याची दहशत निर्माण झाली आहे. दोन हजार ते तीन हजार रुपये दरमहा फुकट नाश्ता घेतात आणि न दिल्यास १२५० रुपये दंड घेण्याची धमकी देतात,असे पीडित नाश्ता विक्रेत्या अण्णांचे म्हणणे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रमाबाई कॉलनीतील मशिदीजवळ श्री साई इटली सेंटर नावाचे दुकान असून, या दुकानात जवळपास सर्व आवश्यक परवाने आहेत, तेथे महिला पोलीस कर्मचारी लता आव्हाड आणि सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी जाधव जेव्हा येतात तेव्हा त्यांना २०० ते २५० रुपयांचे नाश्ता फुकट घेतात. महिला पोलीस कर्मचारी लता आव्हाड या पंतनगर पोलीस ठाण्यात कार्यरत नसूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव घेऊन धमकावून फुकट नाश्ता घेत असतात. अण्णांने नकार दिल्यास १२५० रुपये दंडाची धमकी दिली जाते, त्याचप्रमाणे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून जाधव आणि लता आव्हाड यानी ३ ते ४ हजार रुपयांचा नाश्ता घेतला आहे. इटलीवाला अण्णांने या प्रकरणाची माहिती एका दक्ष नागरिकाला दिली आणि त्यानी या दोघांच्या व्हिडिओसह ट्विटरवर टाकला व पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी केली. तर २१ नोव्हेंबर रोजी ट्विटरवर केलीली होती त्यानंतर पंतनगरचे दक्ष प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी पीडित अण्णाला पोलीस ठाण्यात बोलावून त्याचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्याचा जवाब नोंद करुण घेतला आहे, मात्र याप्रकरणी त्या दोघावर कारवाई होणार का ? त्याला न्याय मिळेल का,अशी हमी कोणीही दिलेली नाही, तर पीडित अण्णांचे म्हणणे आहे की, माझ्या सोबत असेच होत राहिल्यास मला माझा व्यवसाय बंद करावा लागेल, कारण वरील दोन्ही लोकं त्यांच्या कृत्यापासून परावृत्त होणार नाहीत असे वाटते.