नेरूळमध्ये मतदान केंद्राबाहेर एका गाडीत आढळले लॅपटॉप आणि जॅमरसारखे साहित्य; तुर्भे पोलिसांनी गाडीसह एकाला घेतलं ताब्यात

Spread the love

नेरूळमध्ये मतदान केंद्राबाहेर एका गाडीत आढळले लॅपटॉप आणि जॅमरसारखे साहित्य; तुर्भे पोलिसांनी गाडीसह एकाला घेतलं ताब्यात

योगेश पांडे/वार्ताहर 

नवी मुंबई – राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असतानाच नवी मुंबईत नेरूळमध्ये एका गाडीत संशयास्पद वस्तू आढळून आल्यानं खळबळ उडाली. या प्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे. नेरूळमधील शिवाजी नगर परिसरात मतदान केंद्राबाहेरच एका गाडीत लॅपटॉप, जॅमरसारखे साहित्य आढळले होते. मतदान मशीन हॅक करणारी यंत्रणा असावी या संशयावरून तुर्भे पोलिसांनी गाडीसह एकाला ताब्यातही घेतलं होतं. याबाबत मिळालेली माहिती अशी की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्राच्या परिसरात कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नेरुळमध्ये शिवाजीनगर परिसरात एका गाडीत काही संशयास्पद हालचाली आढळून आल्या. गाडीची तपासणी केली असता लॅपटॉपसह इतर साहित्य सापडले. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केली असता मोबाईलमधील चीप टेस्ट करण्याचं हे काम असल्याचं सांगण्यात आलं. ही सर्व यंत्रणा टेस्टिंगसाठीची असल्याचं संबंधित कर्मचाऱ्याने सांगितले.

पोलिसांनी गाडीतून जप्त केलेल्या सर्व वस्तू या मार्कोस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या आहेत. याचा वापर करून मोबाईलमधील चीप टेस्ट करण्याचे काम केले जाते. त्याच टेस्टिंगची सर्व यंत्रणा असल्याचे समोर आल्याने असे कोणतेही मतदान यंत्रणा हॅक करण्यासाठी आणलेल्या वस्तू नसल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon