मुंबईत बापाने केली आपल्या अडीच वर्षाचा मुलीची हत्या
रवि निषाद/प्रतिनिधि
मुंबई – मानखुर्द पोलीस स्टेशन च्या हद्दीमध्ये दि.७ नोव्हेंबर रोजी रात्रो ११ वाजेच्या सुमारास साठे नगर परिसरात राहणाऱ्या आरोपी उमेश घोलवड (२३) त्यानी त्याच्या पत्नीच्या पहिल्या नवऱ्यापासून असलेल्या अडीच वर्षीय मुलीची रागापोटी हत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मानखुर्द पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक एम.घोरपडे यांचा सांगण्यानुसार आरोपी उमेश घोलवड याच्या पत्नीच्या पहिला नवन्यापासून एक अडीच वर्षाची मुलगी होती. तिची देखभाल करताना उमेशला राग होता. मुलीची आई घर काम करणारी असून आरोपी हा टेम्पो चालकाचे काम करतो. त्या मुलीला सांभाळण्यासाठी उमेशला जड जात होते. आई घरात नसताना आरोपी व मयत मुलगी घरात एकटी असताना आरोपीने हे कृत्य केलेले आहे. या घटनेची सुचना प्राप्त होतात पोलिसांनी आरोपी उमेशाला तात्काळ अटक केली असून सध्या आरोपी उमेश घोलवड पोलीस रिमांडमध्ये आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.