धक्कादायक ! ज्येष्ठ नागरिकावर अनैसर्गिक अत्याचार; पुण्यातील संतापजनक प्रकार, आरोपीवर गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे– पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना धायरी परिसरात घडली आहे. एका ५७ वर्षीय व्यक्तीवर दारुच्या नशेत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना पुण्याच्या धानोरी परिसरात घडली आहे. या प्रकरणी एका २४ वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रिन्स प्रेमकुमार सिंग (वय-२४, रा.धानोरी, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. तो पीडित व्यक्तीच्या ओळखीचा आहे. आरोपीने तक्रारदार ज्येष्ठ नागरिकास दारू पाजून दारुच्या नशेत त्यांच्याशी अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. एवढेच नाही तर त्याचे अश्लील फोटो काढून ते नातेवाईक, ओळखीचे लोक व मित्र यांच्यात व्हायरल करण्याची धमकी देत दिली. तसेच चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकीही दिली. आरोपीने तक्रारदार व्यक्तीकडूनी नवीन मोटारसायकल व मोबाईलही घेतला. तसेच वेळोवेळी २ हजार, ५ हजार असे एकूण २० ते २५ हजार रुपयेही घेतले. तो सातत्याने तक्रारदार व्यक्तीकडून पैशांची मागणी करत होता. हा त्रास सहन न झाल्यामुळे अखेर पीडित व्यक्तीने पोलिस ठाणे गाठून आपबिती कथन केली. त्यातून हा संतापजनक प्रकार उजेडात आला. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात आरोपी प्रिन्स प्रेमकुमार सिंग याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पीडित व्यक्तीचे मागील दीड वर्षांपासून बदनामी करण्याची धमकी देत लुटमार व लैंगिक शोषण करत होता. विश्रांतवाडी पोलिस पुढील तपास करत आहेत.