बाळ अदलाबदल प्रकरण; नाशिक जिल्हा रुग्णालयातील ८ जण निलंबित
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – काही दिवसांपूर्वी बाळ अदलाबदल प्रकरण प्रचंड प्रमाणात गाजले होते. यानंतर खडबडून जागे झालेली आरोग्ययंत्रणा कामाला लागली आहे. आता तर जिल्हा शासकीय रुग्णालयात बाळ अदलाबदल प्रकरणी आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
जिल्हा रुग्णालयात अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. यानंतर नातेवाईकांनी बाळ घेण्यास नकार देत जिल्हा रुग्णालयात ठिय्या मांडत या प्रकरणात दोषी असणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता याप्रकरणी आरोग्य विभागाने कारवाई करत सात डॉक्टर आणि एका परिचारिकेचे आरोग्य विभागाने तडकाफडकी निलंबन केले आहे. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात होता.