पुण्यात बॉक्समध्ये सापडला तरुणाचा मृतदेह; पोलीसांकडून अधिक तपास सुरु
योगेश पांडे/वार्ताहर
पुणे – पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. कोंढवा बोपदेव घाट लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे. तर अशातच हडपसरमध्ये एका बॉक्समध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. मृतदेह बॉक्समध्ये टाकून फेकून देण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमध्ये शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. एका अनोळखी इसमाची हत्या करण्यात आली. हत्येनंतर या इसमाचा मृतदेह एका बॉक्समध्ये पॅक करण्यात आला. त्यानंतर हिंगणे मळा कॅनॉलच्या शेजारी हा बॉक्स फेकून देण्यात आला होता. स्थानिकांना हा बॉक्स आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांना तातडीने माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पाहणी केली असता मृतदेह बांधलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या मृतदेहाची ओळख अद्याप पटली नाही. पोलीस अधिक तपास पोलीस करत आहे.