एनआरआई पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पुलिस निरीक्षकाला अटक
रवी निषाद/प्रतिनिधी
नवी मुंबई – एका युवकाचे वडील जेल मध्ये होते. त्यांना लवकर जामिन मंजूर व्हावी म्हणून त्यानी एनआरआई पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. वरिष्ठ पुलिस निरीक्षक सतीश संभाजी कदम (५५) यानी त्याच्याकडून पैशांची मागणी केली. त्यामधील साडे तीन लाख रुपये स्वीकारतना कदम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अटकला. तक्रारदार यांचे वडील यांचे विरुद्ध एनआरआई सागरी पोलीस ठाणे नवी मुंबई या ठिकाणी इमारत पडली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये ते त्याचे वडील सध्या तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत सदर गुन्ह्यामध्ये मदत करण्याकरिता व जामीन मिळवून देण्याकरिता सदर आरोपी लोकसेवक यांनी प्रथम १२ लाख व त्यानंतर २ लाख अशा रकमेची मागणी करून ती तक्रारदार यांचे कडून स्वीकारली. त्यानंतर तक्रारदार यांचे वडीलांवर पुन्हा एनआरआई सागरी पोलीस ठाणे येथे दिनांक २/१०/२०२४ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद गुन्ह्यात ताबा न घेण्याकरिता व अटक न करण्याकरिता तसेच गुन्ह्यामध्ये मदत करण्याकरिता रुपये ५ लाख रकमेची मागणी केली. सदर आरोपी लोकसेवक यांना लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई या ठिकाणी दि.०८/१०/२०२४ रोजी लेखी स्व: हस्ताक्षरात तक्रार दिली त्याच दिवशी दि.०८/१०/२०२४ रोजी पंचा समक्ष पडताळणी करण्यात आली. पडताळणी मध्ये सदर आरोपी लोकसेवक यांनी तळजोडीअंती रुपये ४,००,०००/- रकमेची मागणी करून सदरची रक्कम त्याच दिवशी रात्री २२.०० वाजता ते राहत असलेल्या इमारती जवळ आणून देण्याचे सांगितले. त्यावरून सापळा कारवाई मध्ये सदर आरोपी लोकसेवक सतीश संभाजी कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक एनआरआई सागरी पोलीस ठाणे नवी मुंबई यांनी ते रहात असलेल्या नवी मुंबई येथील इमारती खाली पंचासमक्ष लाचेची रक्कम रुपये ३,५०,०००/- स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले म्हणून भ्र.प्र.अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कारवाई पर्यवेक्षण अधिकारी सरिता भोसले सहाय्यक पोलीस आयुक्त ला.प्र.वि मुंबई, गुन्हा तपास अधिकारी कृष्णा मेखले पोलीस निरीक्षक ला.प्र.वि. बृहन्मुंबई, मार्गदर्शक अधिकारी संदीप दिवाण अपर पोलिस आयुक्त, ला.प्र.वि, मुंबई, राजेन्द्र सांगळे अपर पोलीस उपआयुक्त, ला.प्र.वि, मुंबई, अनिल घेरडीकर
अपर पोलीस उप आयुक्त, ला.प्र.वि, मुंबई सक्षम अधिकारी पोलिस आयुक्त नवी मुंबई यांच्या पथकाने केली.