नांदेड स्थानिक गुन्हा शाखेने २ लाख ३७ हजारांचे १९ मोबाईल केले जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
नांदेड – नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने तीन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून २ लाख ३७ हजार रुपये किंमतीचे १९ मोबाईल हस्तगत केले आहेत. तिघांविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस अंमलदार संतोष बेल्लुरोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ६ ऑक्टोबर रोजी पोलीस उपनिरिक्षक साईनाथ पुयड, पोलीस अंमलदार बालाजी तेलंग, किशन मुळे, विलास कदम, गणेश धुमाळ, बालाजी कदम, राजू डोंगरे, राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे हे गस्त करत असतांना संशयीतरित्या फिरणारे गुलाब राजू प्रधान (२५), अमोल उर्फ अम्या राजू खंदारे (१८) आणि शिवा उर्फ शिवम जालिंदर दवणे (२४) या तिघांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ताब्यात घेवून विचारणा केली असता त्यांच्याकडे एकूण १७ मोबाईल सापडले. यांची किंमत २ लाख ३७ हजार रुपये आहे.या १९ मोबाईलबद्दल ते कोणतेही कागदपत्र दाखवू शकले नाहीत. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ. खंडेराय धरणे, सुरज गुरव, सहाय्यक पोलीस अधिक्षक कृतिका आदींनी स्थानिक गुन्हा शखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्यासह त्यांच्या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.