अहमदनगरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी; तीस जणांवर गुन्हा दाखल

Spread the love

अहमदनगरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी; तीस जणांवर गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

अहमदनगर – संगमनेर शहरामध्ये ईद साजरी होत असतानाच मुस्लिम समाजाच्या दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याने या मिरवणुकीला गालबोट लागले. याप्रकरणी शहर पोलिसांनी दोन्ही गटाकडील ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संगमनेर शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्याच्या कारणावरून ही हाणामारी झाली असल्याचे समजते. शहरातील लखमीपुरा परिसरात दोन गटामध्ये हमरीतुमरी झाली होती. मात्र समाजातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला होता. रात्री उशिरा या वादाचे तीव्र पडसाद उमटले. या घटनेत दोन्ही बाजूने तलवारी, चाकू, लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि दगडांचा मुक्त वापर करण्यात आला. या धुमश्चक्रीमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. यामध्ये शहनाज बादशहा कुरेशी (वय ५४, रा. राजवाडा, संगमनेर) जखमी झाले. त्यांनी शहर पोलीस ठाण्यात पहिली तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी दानिश फावडा, परवेज शेख, आदिल शेख, रजा मुख्तार, जमील शेख (सर्व रा. लखमीपुरा) यांच्यासह अज्ञात १० ते १५ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

तर दुसरी फिर्याद शहानवाज शकूर शेख (रा. लखमीपुरा, संगमनेर) यांनी दिली. यावरून पोलिसांनी नवाज जावेद कुरेशी, वाहेद अब्दुल कुरेशी, कैसर जावेद कुरेशी, नदीम खलील कुरेशी, मशरूफ नासिर कुरेशी, कौशल बाबू कुरेशी, हर्षद जावेद कुरेशी, अब्दुल बारी करेशी व इतर आठ ते दहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon