विसर्जनासाठी गेलेला १६ वर्षीय मुलगा बुडाला; होडीच्या मदतीनं शोध सुरु
योगेश पांडे/वार्ताहर
इंदापूर – पुण्याच्या इंदापूरमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट लागलं आहे. इंदापूर तालुक्यातील श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर गावी नीरा नदीमध्ये गणेश विसर्जनासाठी गेलेला १६ वर्षीय मुलगा बुडाल्याची घटना घडली आहे. त्याचा शोध सध्या घेतला जात आहे. अनिकेत विनायक कुलकर्णी – १६ हा मूळचा धाराशिव जिल्ह्यातील परांड्यातील हांडुग्रीचा रहिवासी आहे. तो मागील नऊ वर्षांपासून लक्ष्मी नृसिंह वेदपाठ शाळेत शिक्षण घेत होता. घटनास्थळी गावकरी, पोलीस, महसूल प्रशासन दाखल झाले असून होडीच्या मदतीनं त्याचा शोध घेतला जात आहे.
मंगळवारी दुपारी तीन वाजता निरा नरसिंहपुर येथील नीरा नदीच्या लक्ष्मी घाटावर अनिकेत गणेश विसर्जनासाठी गेला होता. आणि त्याचवेळी ही घटना घडली. बुडाल्यापासून त्याचा शोध घेतला जात आहे. लक्ष्मी नृसिंह मंदिराजवळ असलेल्या नदीत ही घटना घडली.